एखाद्या चित्रपटाचं एखादं वाक्य किंवा एखादा प्रसंग आपल्या डोक्यात काही दिवस तरी खूळ मांडून असतोच आणि त्या एखाद्या वाक्यात जर एखादा महत्व पूर्ण बोध असेल तर आपोआप तो आपल्याला विचार करायला भाग देखील पाडतो. कारण कळत नकळत च आपण त्या वाक्याला किंवा त्या चित्रपटामधल्या घडामोडींना कुठे तरी आपल्या आयुष्यासोबत जोडू लागतो आणि आपल्यातलं बालमन डोळ्या पुढे आपला चित्रपट देखील तयार करून आपल्याला दाखवतं.
अगदी असाच एक माझा अनुभव मला सांगावासा वाटतो. मी कधी कुणाला सांगू शकलो नाही पण मनात नेहमी असतं कि तो अनुभव सांगावा पण तसा योग देखील येत नाही. पण या ब्लॉगद्वारे तो प्रयत्न मी केला.
मी शाळेत असतना "लक्ष्य" हा ह्रितिक रोशन चा चित्रपट पाहिला होता. त्यातला एक प्रसंग खूप काही शिकवून गेला.तो प्रसंग म्हणजे जेव्हा ह्रितिकला प्रीती झिंटा चे वडील विचारतात कि पुढे काय बनायचं ठरवलंय आणि ह्रितिक त्या प्रश्नावर अनुत्तरीत होतो.त्यावर तिचे वडील त्याला जे सांगतात ते आपल्या सर्वांना च विशेष महत्वाचे आणि आयुष्यात लागू करावे असे काही सांगतात.
"तू जे काही करशील ते चांगलं आणि मनापासून कर. मग तू एखादा घास कापणारा जरी झालास तरी एक चांगला घास कापणारा हो. तू ज्या क्षेत्रामध्ये काम करशील ते फक्त चांगलं आणि मनापासून कर यश तुला आपोआप मिळेल".
खरोखर या वाक्याने मला खूप दिवस वेडं केला होतं. मी पुढे काय बनणार हे तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतंच पण मग हे आपल्या आयुष्यात कसं लागू करता येईल या गोष्टी चा विचार मात्र नेहमी डोक्यात यायचा.
वेळ लागला पण प्रयत्न चालू ठेवले होते मी. मग अगदी आमच्या किराणा मालाच्या दुकानात बिस्किटाचे पुडे मांडण्यापासून ते माझ्या अभ्यासाच्या वही ला कव्हर लावण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट करताना मी तो प्रयत्न केला कि जे काम करू ते चांगलं करू. हळू हळू त्यात आनंद मिळू लागला कारण त्या केलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होऊ लागलं. ती गोष्ट कोणतीही असो पण ती कुणाला न कुणाला नक्की आवडत असे. मग हा प्रयत्न मी प्रत्येक ठिकाणी चालू ठेवला. वह्या पुस्तके , सबमिशन्स आणि मग ऑफिस चे काम करताना मला याचा विशेष फायदा झाला.
मी आज हि प्रत्येक ठिकाणी हा प्रयत्न करत आहे.कळत नकळत त्या गोष्टीचा मला आज खूप फायदा होतोय. मला एवढंच वाटतं कि हा प्रयत्न प्रामाणिक असावा त्याला यश आपोआप मिळेल.
आणखी एक "थ्री इडियटस" मधून मिळालेला मेसेज मी सध्या माझ्या आयुष्यात लागू करून पाहतोय. " सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेल्लेंस के पीछे भागो. सक्सेस झक मारके पीछे आयेगा."
सध्या तो एक्सेल्लेंस मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. सक्सेस बद्दल माहित नाही.
तुम्ही देखील प्रयत्न करून पहा. थोडसं पोरकट बोलतोय पण हा माझा अनुभव मला सांगावासा वाटला.
चित्रपट म्हणजे मनोरंजन असा समज सध्या गाजतोय. पण त्यात हि एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर प्रोत्साहन देण्याची क्षमता असते हे मी अनुभवलं.