महेश तू अचानक चित्र काढायला कसा लागलास असा प्रश्न सर्वच नातेवाईकानी आणि जुन्या मित्र मैत्रिणीनी विचारला. बऱ्याचदा जे मनात आहे ते नेमकं उत्तर देता आलं नाही.
सर्व च कला शिकाव्या लागतात तेव्हाच त्या जमतात असं माझं स्वतःचं मत झालं होतं. त्यामुळेच बऱ्याच गोष्टी मध्ये आवड असून ती शिकत बसायला लागेल म्हणून ती करणंच टाळत गेलो. जेव्हा ती गोष्ट किंवा ती कला अवगत करायची असं विचार मनात यायचा तेव्हा दुसरं मन म्हणायचं कि "जाऊ दे रे तुला नाही जमणार...." आणि करिअरसाठी त्याचा काय उपयोग होणार?? असे विचार मनात येत राहिले आणि मी ती आवड मनात दाबून ठेवत गेलो.
बरीच वर्ष शिक्षण आणि नोकरी हेच लक्ष्य डोळ्यापुढे ठेऊन मी कले कड दुर्लक्ष केलं. त्यातली आवड देखील संपलीच होती. आयुष्याला एक वेगळा वळण लागलं होतं.नोकरी साठी परदेशगमन सुद्धा झालं. पण याच परदेशगमनाने जरा मनाला एक वेगळा आराम आणि एक वेगळाच एकांत दिला.
याच संधीचा मी फायदा घेत माझी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायची ठरवली. ती म्हणजे एखादी तरी कला अवगत करायची आणि मी तशी धडपड सुरु केली. सुरुवात एका स्केच बुक पासून झाली. मग एक गिटार सुद्धा रूम मध्ये आली तिच्या मागोमाग कीबोर्ड आला. पेंटिंग चे सर्व साहित्य आले. जमेल तसं जमेल ती कला मी अवगत करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि करतोय सुद्धा. माझ्यासाठी ती एक अपूर्ण राहिलेली इच्छा होती म्हणून ती पूर्ण करण्याची मी धडपड केली. पण एक शिकवण मिळाली आणि तीच सर्वाना सांगावीशी वाटते.
शिकवण अशी मिळाली कि तेव्हा वेळ वाया घातला नसता तर आत्ता या सर्व कला अवगत असत्या. आणि करिअर करायचं म्हणून नाही पण त्या मध्ये मिळणारा आनंद देखील खूप अनमोल आहे. कदाचित थोडं लवकर शिकलो असतो तर बरं झालं असतं असं सारखं च मन म्हणत असतं. थोडी उशिरा आली पण अक्कल आली !!!
म्हणून आणखी एक मनात दाबून ठेवलेली इच्छा जरा करून पहावीशी वाटली ती म्हणजे लेखन कला अवगत करू पाहण्याची ........वेळ लागेल पण खात्री आहे कि या मधला पण आनंद लुटून पाहता येईल.
हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाला मला सांगावेसे वाटेल कि करिअर साठी म्हणून नाही पण त्यातला आनंद लुटता यावा म्हणून तरी एखादी कला अवगत करायचा प्रयत्न नक्की करा. कदाचित हा आनंद अनुभवल्यावर च त्यातली मजा कळेल.एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या कलेची आवड असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचा आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. निदान जे मला उशिरा समजलं ते त्यांना लवकर अनुभवता येईल.

I red with PL Deshpande that you have to follow your hobby which will give immense pleasure and peace of mind.. good going. Keep it up!!!
ReplyDeleteThanks.. and its true wht PL Deshpande said.. I am getting that peace of mind and much knowledge as well as joy. i realizes that instead of spending time in some useless stuffs its better to keep creating arts.
Deleteखूपच छान महेश...!! तुझी कला,तुझी त्या साठीची धडपड आणि तुझा अनुभव सुद्धा.
ReplyDeleteअसच जप सगळं... :-)
नक्की !!! मी पूर्ण प्रयत्न करत आहे!!!
DeleteMasta... enjoy life
ReplyDeleteमहेशजी ...फार सुंदर अत्यंत छान ... आपले विचार वाचले आणि त्यावर मला प्रतीक्रिया द्यायची आहे पण ती सध्याकाळी निवात देईल फार सुंदर
ReplyDeleteKhup chaan vichar ahet...keep it up.
ReplyDeleteAjun jast Kay sangnar mi eyewitness ahech sarv goshtincha... v nice all d best...
Thanks a lot Sushil.. Ajun tar baryach goshtincha eye witness whyacha ahe tula.. :-p
Deletemahesh u r just a versatile.........
ReplyDeleteits not i am saying because i am your friend but ..... it is true....
Thanks Abhay !! Still lot of improvements are to be done to become versatile..
ReplyDeleteYahi to jindagi hai....keep smiling always
ReplyDeleteKhupach Chan Apratim Sundar.....!!!!!!!
ReplyDeleteGood :) Keep writing
ReplyDeletethnks :-)
Delete