आयुष्यात अनेक अनुभव येतात जे वेगवेगळ्या शिकवण देऊन जातात. अगदी सरळ सांगायचं तर शाळेत शिकवून परीक्षा घेतली जाते पण जीवनात परीक्षा घेऊन शिकवणी दिल्या जातात. माझ्या देखील आत्तापर्यंतच्या जीवनात मला काही असे अनुभव आले ज्यांनी आधी परीक्षा घेतली आणि मग शिकवण दिली. त्यात मला एका गोष्टीची जाणीव झाली आणि ती लिहून ठेवावीशी वाटली जी कदाचित वाचणाऱ्याला मार्गदर्शक ठरू शकेल.
"Be Positive " हे तुम्ही आम्ही ऐकलेलं नेहमीचं वाक्य आहे. ज्या मध्ये सोप्पा बोध आहे कि काळजी करू नका आणि positive राहा, सर्व ठीक होईल. मी या गोष्टीला डोळ्यासमोर ठेऊन जीवनातल्या बऱ्याच परीक्षा द्यायचा प्रयत्न केला पण हळू हळू एक अनुभव यायला लागला आणि माझा मन मलाच सांगू लागलं कि " Don 't be positive and be ready to face the worst ".
जेव्हापासून या "be ready to face the worst " चा मी वापर करू लागलो, आपोआप वाईटात वाईट काय होऊ शकतं या साठी मानसिक तयारी होऊ लागली आणि समोर येणारे आव्हान पेलण्यासाठी एक "positive attitude" तयार होत गेला. हा एक चांगला अनुभव मिळाला ज्याने एक कळले कि "आंधळेपणाने सर्व चांगलं होईल असं म्हणत राहण्यापेक्षा वाईटात वाईट काय होईल या साठी मानसिक तयारी करून त्याला सामोरं जाण्याची हिम्मत मिळू लागते."
Nice thought brother....keep blogging
ReplyDeleteIts .....true. ..
ReplyDelete